HSC Exam 2023 : नियतीने पाहिली परीक्षा! घरात वडिलांचा मृतदेह असताना त्याने सोडविला बारावीचा पेपर

Solapur News Today : पेपरला अवघे काही तास शिल्लक उरले असताना घरात वडिलांचं निधन झालं. त्यामुळे या विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
Solapur News Today
Solapur News TodaySaam TV

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. बारावी विषयाचा गणिताचा पेपर असल्याने विद्यार्थ्याने भरपूर तयारी केली. पण पेपरच्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी त्याच्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं. पेपरला अवघे काही तास शिल्लक उरले असताना घरात वडिलांचं निधन झालं. त्यामुळे या विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. (Latest Marathi News)

Solapur News Today
HSC Exam 2023 Paper : बुलडाण्यात बारावीचा पेपर फुटला; परीक्षेआधीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

अखेर मन घट्ट करून मुलाने वडिलांचा मृतदेह घरात ठेवून आधी गणिताचा पेपर दिला. त्यानंतर वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेनं हुलजंती (Mangalvedha) गावातील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते. तुकाराम कलप्पा रूपटक्के असं या बारावीच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर कलप्पा आबा रूपटक्के (वय ६० वर्ष) असं त्याच्या वडिलांचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बारावीचा (HSC Exam) गणिताचा पेपर असल्याने तुकारामने गुरूवारी रात्रभर अभ्यास केला. मात्र, शुक्रवारी सकाळी अचानक त्याच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देखील तुकारामच्या आईने त्याला धीर देत पेपरला पाठवलं. आईच्या आदेशानंतर तुकाराम हा मनावर दगड ठेवून परिक्षेला सामोरा गेला. आणि गणिताचा पेपर देऊन दुपारी घरी परतला.

Solapur News Today
Parabhani News : दहावीच्या पेपरचा अभ्यास करतानाच विद्यार्थीनीने घेतला गळफास; परभणीतील धक्कादायक घटना

पेपर संपल्यानंतर केले अंत्यसंस्कार

तुकारामने आधी गणिताचा पेपर दिला आणि पेपर संपल्यानंतर घरी परतला. वडिलांच्या अंत्यविधी करत मुखाग्नी दिली. नातेवाईकांनीही मुलासाठी दुपारपर्यंत अंत्यविधी थांबवला होता. हुलजंती गावात (Solapur News) सकाळपासून शोककळा पसरली होती. गावातील अनेक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून ग्रामस्थही विशेष प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, तुकारामच्या धैर्याची ही परीक्षा ठरली. परीक्षा काळात आधीच विद्यार्थ्यांच्या मनावर प्रचंड ताण असतो. फक्त विद्यार्थीच नव्हे तर कुटुंबीय तणावात असतात. अशात अचानक एखादी दुःखद घटना घडल्याने सर्वांना मोठा धक्का बसतो. पण तुकारामला कुटुंबीयांनी धीर दिल्याने त्याला बिकट प्रसंगाला तोंड देता आलं.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com