Gautami Patil Program: गौतमी आली पण नाचलीच नाही, पोलिसांनी शो पाडला बंद

Solapur Latest News: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शीमध्ये गौतमी पाटीलचा शो पोलिसांनी बंद पाडला.
Gautami Patil Program
Gautami Patil ProgramSaam Tv

Solapur News: सबसे कातिल गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं आहे. सध्या गावाखेड्यांमध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलचे शो होत आहेत. गौतमीला पाहण्यासाठी संपूर्ण गाव गर्दी करतं. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

नुकताच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शीमध्ये गौतमी पाटीलचा शो झाला. या शोसाठी गौतमी आली खरी पण एकाच गाण्यावर नाचली आणि पोलिसांनी (Solapur Police)s शो बंद पाडला. त्यामुळे गौतमीचा शो पाहण्यासाठी आलेले सर्वजण नाराज झाले.

Gautami Patil Program
Maharashtra Weather Update: काळजी घ्या, राज्यात उष्णतेची लाट; नाशकात उष्माघाताचा पहिला बळी

बार्शीमध्ये सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने शुक्रवारी गौतमी पाटीलच्या शोचे आयोजन केले होते. हा शो संध्याकाळी सात वाजता सुरु होणार होता. त्यासाठी शो सुरु होण्यापूर्वी सहा वाजताच मोठ्यासंख्येने सर्वांनी गर्दी केली होती. या शोसाठी अनेकांनी तिकीट काढून हजेरी लावली होती. पण हा शो वेळेवर सुरु झाला नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास शो सुरु झाला. कारण गौतमी पाटीलच या शोच्या ठिकाणी उशीरा पोहचली. त्यामुळे या कार्यक्रमासाठी सहा वाजल्यापासून येऊन बसलेले सर्वजण कंटाळले.

Gautami Patil Program
Parineeti-Raghav Engagement: बहीण Parineeti च्या साखरपुड्यासाठी 'देसी गर्ल' दिल्लीत, Priyanka Chopra चा व्हिडिओ व्हायरल

अशामध्ये गौतमी पाटीलने स्टेजवर ढासू एन्ट्री मारली. शोसाठी हजेरी लावलेल्या सर्वांनी शिट्यांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला. एका गाण्यावर गौतमी पाटीलनेने जबरदस्त डान्स केला. त्यानंतर पोलिसांनी तिचा शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतर गौतमीचा शो सुरु असल्यामुळे बार्शी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, गोंधळ होऊ नये यासाठी हा शो बंद पाडला.

पोलिसांनी सुरुवातीला डीजे बंद केला आणि नंतर संपूर्ण शोच बंद पाडायला भाग पाडले. त्यामुळे गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी आलेल्या सर्वांना एकाच गाण्यावर समाधान मानावे लागले आणि परत घरी जावे लागले. गौतमी फक्त एकाच गाण्यावर नाचल्यामुळे बार्शीकर नाराज झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com