Solapur News: सोलापूरच्या तरुणाचे मोडले अमेरिकेचे रेकॉर्ड; कार्ड थ्रोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, तिसऱ्यांदा गिनीज बूकमध्‍ये नोंद

सोलापूरच्या तरुणाचे मोडले अमेरिकेचे रेकॉर्ड; कार्ड थ्रोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, तिसऱ्यांदा गिनीज बूकमध्‍ये नोंद
Solapur News Guinness Book Record
Solapur News Guinness Book RecordSaam tv

सोलापूर : सोलापूरमधील अठरा वर्षीय आदित्य कोडमूरचे नाव गिनीज बूकमध्ये (Guinness Book) नोंदवले गेलेय. विशेष म्हणजे आदित्यने तीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवून गिनीज बुकमध्ये तिसऱ्यांदा नाव कोरलय. पत्त्याच्या डावातील कार्ड (Solapur) फेकण्यात म्हणजेच कार्ड थ्रो या प्रकारात आदित्यने हे वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.निर्धारित टारगेटवर (लक्ष्य) अचूकपणे खेळण्यातील पत्ते फेकण्यात त्यानं अमेरिकेच्या (America) कार्ड थ्रोअरचे रेकॉर्ड मोडलेय. आता 'कार्ड थ्रो'चं वर्ल्ड रेकॉर्ड आदित्यच्या नावावर जमा झालंय. (Tajya Batmya)

Solapur News Guinness Book Record
Chalisgaon News: आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी बसविले; काळजी घ्या म्‍हणत रेल्वेतून उतरताना मुलाचा मृत्यू

अमेरिकेन थ्रोअर रिचमिक्स ज्युनिअर याने ह्युमन टारगेटवर ५६ कार्ड अचूकपणे थ्रो करून गिनिज बुकात आपल्या नावाची नोंद केली होती. मात्र आदित्यने एका मिनिटात ६६ कार्ड थ्रो करून स्वतःचे नाव या रेकॉर्डवर कोरले आहे. गेल्या आठ वर्षांपासून आदित्य वेगवेगळे जादूचे प्रयोग करून दाखवतो.

Solapur News Guinness Book Record
KDMC News: तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणार; केडीएमसी आयुक्तांची तंबी

जानेवारीमध्‍ये केली होती कामगिरी

मात्र आपण काहीतरी वेगळे करावे. यासाठी त्याने तब्बल दोन वर्षे सराव केला. त्यानंतर जानेवारी २०२३ रोजी त्याने कार्ड थ्रो केले. त्यानंतर चार महिन्यांनी त्याला गिनीज बूकमध्ये आपले नाव नोंदले गेल्याचे ईमेलद्वारे सांगण्यात आले. दरम्यान त्याच्या रेकॉर्डमुळे आता जगभरात सोलापूरचा डंका वाजतोय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com