Solapur News: प्रसिद्धीसाठी शेतकऱ्याचा भलताच प्रताप! टोमॅटो चोरीची अफवा पसरवली; पोलीस थेट शेतात आले अन्...

Solapur Tomato Farmer News: शेतकऱ्याने टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे.
Solapur News
Solapur NewsSaamtv

Solapur News: सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच चांदी झाली आहे. अनेक शेतकरी टोमॅटोच्या उत्पादनातून मालामाल झाले असून काही गावात बॅनरही झळकले होते. मात्र एका शेतकऱ्याने टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेवूया सविस्तर...

Solapur News
Sana Khan Case: भाजप पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच मालामाल झाले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटनाही घडल्या. असाच प्रकार सोलापूरमधूनही (Solapur) समोर आला आहे. टोमॅटोमुळे आपले नाव प्रसिद्ध व्हावे, अशी अपेक्षा त्या शेतकऱ्याची होती. त्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावात एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील टोमॅटो चोरीची अफवा पसरवली.

शेतातील टोमॅटो चोरीस गेला आहे. ही अफवा संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. काही सजग नागरिकांनी तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात टोमॅटो चोरीची माहिती पसरली. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जातीने दखल घेत चोरीचा तपास केला. त्यामध्ये भलताच प्रकार समोर आला.

Solapur News
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहाच...

नागरिकांकडून टोमॅटो चोरीची बातमी समजल्यानंतर पोलीस थेट टोमॅटोच्या शेतात पोहोचले. जमलेल्या अनेक शेतकऱ्यांसह शेतात कोनाकोपरा धुंडाळल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर चोरीच झाली नाही या निष्कर्षावर पोलीस पोहोचले. हा संपूर्ण प्रकार प्रसिद्धीसाठी केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, शेतकऱ्याला पोलिसांनी समज देऊन सोडल आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com