Solapur: फ्रुट बियर अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर मधील भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत रसायनमिश्रित फ्रुट बीयर कारखान्यावर पोलिसांनी अचानक छापा Police Raid घालून साहित्यासह 2 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Solapur: फ्रुट बियर अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Solapur: फ्रुट बियर अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्तविश्वभुषण लिमये

विश्वभुषण लिमये

सोलापूर: सोलापूर मधील भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत रसायनमिश्रित फ्रुट बीयर कारखान्यावर पोलिसांनी अचानक छापा Police Raid घालून साहित्यासह 2 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत काल रात्री उशिरा सोलापूरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात Jodbhavi Peth Police Station Solapur गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

आरोग्याला हानिकारक असणाऱ्या या फ्रुट बियरच्या Fruit Beer केंद्राबाबत पोलीस आयुक्तालयातील भरारी पाथकाला ही माहिती मिळाली, त्यानुसार रात्रीउशिरा धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील अवैध व्यवसायंवर आळा बसावा यासाठी सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी विशेष भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.

Solapur: फ्रुट बियर अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
वानखडे यांना धक्का; आर्यन खान प्रकरणात NCB च्या तपासावर हायकोर्टाचे प्रश्नचिन्ह!

याच पथकाने हा रसायनमिश्रित फ्रुट बियरचा साठा जप्त केला आहे. यामध्ये बॉटल सील करण्याचे मशीन, बीयरने भरलेल्या बॉटल, एक माल वाहतूक गाडी जप्त करण्यात आली आहे.

Solapur: फ्रुट बियर अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Solapur: फ्रुट बियर अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्तविश्वभुषण लिमये

दरम्यान, घटनास्थळी अन्न - औषध प्रशासनाकडून तेथील रासायनिक द्रव्य जप्त करण्यात आली आहेत. घोंगडे वस्तीतील तीन खोल्यांच्या एका घरात विषारी द्रव आणि घाण पाण्याचा वापर करून हे विषारी फ्रुट बीयर तयार केले जातं होते, यासंदर्भात अधिक माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब बाळासाहेब भालचिम यांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com