सोलापूरात वीज तोडणी प्रश्न ऐरणीवर; डीपीडीसी बैठकीत एकच हल्लाबोल

कोरोना काळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात भ्रष्टाचार, आमदार राम सातपुते यांचे आरोप
सोलापूरात वीज तोडणी प्रश्न ऐरणीवर; डीपीडीसी बैठकीत एकच हल्लाबोल
सोलापूरात वीज तोडणी प्रश्न ऐरणीवर; डीपीडीसी बैठकीत एकच हल्लाबोलविश्वभूषण लिमये

सोलापूर - काल उशिरापर्यंत चाललेल्या डिपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गदारोळ झाला. शेतकऱ्यांची वीज तोडणी आणि कोरोना काळातील कर्मचाऱ्यांच्या पगारातील भ्रष्टाचार हे दोन विषय प्रामुख्याने गाजले, भ्रष्टाचार चौकशीसाठी सीबीआयला पत्र लिहिणार असल्याचे आमदार राम सातपुते यांनी सांगताच सभेचे अध्यक्ष पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे चांगलेच भडकले.

हे देखील पहा -

तर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. याबाबत ऊर्जा मंत्र्याना भेटून मागणी करण्यात येणार आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम जवळ आला आहे. वीज कनेक्शन जोडणी न झाल्यास याचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो असे मत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले आहे.

सोलापूरात वीज तोडणी प्रश्न ऐरणीवर; डीपीडीसी बैठकीत एकच हल्लाबोल
शाहरुखला आणखी एक धक्का....'या' अभिनेत्रीने दिला चित्रीकरणास नकार

सोलापूर येथे डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार संजय शिंदे, आमदार समाधान अवताडे, आमदार राम सातपुते आदींनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन एमएसईबी कडून तोडली जात आसल्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली. या बाबतीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेवून त्यांना याचे निवेदन देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com