Solapur: लेडी सिंघमची 'तेजस्वी' कामगिरी! 'नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड'ने सन्मानित

सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते 'नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड'ने गौरविण्यात आले आहे.
Solapur: लेडी सिंघमची 'तेजस्वी' कामगिरी! 'नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड'ने सन्मानित
तेजस्वी सातपुते SaamTvNews

सोलापूर : सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते 'नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड'ने गौरविण्यात आले आहे. काल मुंबईतील राजभवनात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडला, राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हे देखील पहा :

त्यात सोलापूर जिल्ह्यातून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचाही समावेश आहे. तेजस्वी सातपुते यांनी ऑक्‍टोबर 2020 मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या एसपी म्हणून पदभार स्वीकारला होता.

तेजस्वी सातपुते
लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेवर दोन वर्ष जबरदस्ती बलात्कार!

कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अतिशय उत्तम काम केले. स्वतः तेजस्वी सातपुते या कोरोनाबाधित झाल्या; मात्र 'वर्क फ्रॉम होम'द्वारे त्यांनी शासकीय सेवा सुरूच ठेवली होती. सोलापूर जिल्ह्यात काम करताना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या 'ऑपरेशन परिवर्तन'ने अनेकांना अवैध धंद्यांपासून दूर करून चांगल्या व्यवसायाकडे वळवले, याची राज्यभरात चर्चा आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com