तेरणा नदी पुलावर भीषण अपघात; कन्नोळीतील एकाचा मृत्यू

accident
accident

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरणा नदीच्या पुलावर एका मालवाहतूक ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये पाठीमागुन धडक देणाऱ्या वाहन चालकाचा मृत्यु झाला आहे. त्याच वाहनातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. solapur-tuljapur-latur-truck-accident-one-died-sml80

accident
नगराध्यक्षांसह मुख्याधिका-यांवर गुन्हा दाखल करा; 'प्रहार'

या अपघातात मृत झालेल्या चालकाचे नाव अण्णावीरया हिरेमठ असे आहे. तो कर्नाटक राज्यातील कन्नोळी येथील रहिवासी आहे. एमपी ०७ एच बी ७५७८ हा ट्रक सोलापूरहून लातूरच्या दिशेने जाताना औसा तालुक्यातील उजनी येथील तेरणा नदीवरील पुलावर अचानक टायर फुटले. त्यामूळे ट्रक भर रस्त्यात उभा करण्यात आला होता. त्याच वेळी वाहन क्रमांक के ए २८ सी २०४० या ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.

ही धडक इतकी जोराची होती. पुढील ट्रक पूर्णतः रस्त्याच्या कडेला ढकलला गेला. परंतु धडक देणाऱ्या ट्रकच्या पुढील बाजूचा पूर्ण चक्काचूर झाला असून चालकाचा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. त्याचा सहकारी गंभीर जखमी असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com