या तर नर्सच्या वेशातील पुतना; 10 दिवसाच्या बाळाला HIV आहे सांगून विकलं

जिल्हा रुग्णालयात जन्म झालेल्या 10 दिवसीय बालकाच्या आईला मीना चौधरी हिने HIV असल्याचे खोटे सांगून तिच्यापासून बाळाला दूर केले आणि विकले.
या तर नर्सच्या वेशातील पुतना; 10 दिवसाच्या बाळाला HIV आहे सांगून विकलं
या तर नर्सच्या वेशातील पुतना; 10 दिवसाच्या बाळाला HIV आहे सांगून विकलंSaam TV

चंद्रपूर : नवजात बालकांना विकणारी टोळी चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी चंद्रपूर व नागपूर येथून 5 महिलांसह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील 2 आरोपी महिला नागपुरात परिचारिका रुपात कार्यरत आहेत. तक्रारकर्त्या महिलेची शेजारी मीना चौधरी यातील मास्टमाईंड असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चंद्रपूरच्या (Chandrapur) जिल्हा रुग्णालयात जन्म झालेल्या 10 दिवसीय बालकाच्या आईला मीना चौधरी हिने HIV असल्याचे खोटे सांगून तिच्यापासून बाळाला दूर केले आणि नागपुरातील एक स्वयंसेवी संस्था अशा वेगळ्या केलेल्या बाळाला सांभाळते व त्यासाठी काही रक्कम पालकांना देते, असा दावा करून हा व्यवहार केला गेला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

या तर नर्सच्या वेशातील पुतना; 10 दिवसाच्या बाळाला HIV आहे सांगून विकलं
Solapur : अटकेत असलेल्या 19 आरोपींना कोरोनाची लागण, क्वारंटाइन सेंटरमधून 2 आरोपी फरार

मात्र बाळाच्या आईला हा व्यवहार संशयास्पद वाटल्याने दहा दिवसाचे बालक स्वतःपासून दूर गेल्याने या मातेचा संशय बळावला आणि न राहून तिने शेवटी पोलिसांमध्ये याबाबत तक्रार केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत हे 10 दिवसाचे बाळ चंद्रपूरच्याच एका महिलेला दोन लाख 75 हजार रुपयात विकल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आणले. पोलीसांनी या टोळीच्या अन्य दुव्यांचा तपास करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com