Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; मुंबईचे बडे पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला

आज मुंबईच्या दहिसर भागातील काही स्थानिक पदाधिकारी आणि नेते मंडळींनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV

संजय गडदे

Maharashtra Politics : ठाकरे गटाला एकामागून एक धक्के सुरूच आहेत. शिंदे गटात सातत्याने ठाकरे गटातून पदाधिकारी, कार्यकर्ते जाण्याचा प्रवाह काही कमी होताना दिसत नाही. आज मुंबईच्या दहिसर भागातील काही स्थानिक पदाधिकारी आणि नेते मंडळींनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. (Latest Maharashtra Politics News)

मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे वॉर्ड 12 चे शाखाप्रमुख राजेंद्र पवार, उपशाखाप्रमुख पंकज मसुरकर आणि दीपक आचरेकर सोबत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आज शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.

नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. मात्र ही युती ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना मान्य नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटातून पुन्हा एकदा पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडताना दिसत आहेत.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Maharashtra Politics : जयंत पाटलांचा गौप्यस्फोट मग स्पष्टीकरण; पहाटेचा शपथविधी, राष्ट्रपती राजवट अन् पवारांची खेळी...

काल देखील महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काल पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com