पवार साहेब जिंदाबाद! 'साेमेश्वर' राष्ट्रवादीचा, भाजपचा धुव्वा

पवार साहेब जिंदाबाद! 'साेमेश्वर' राष्ट्रवादीचा, भाजपचा धुव्वा
someshwar vikas panel

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या someshwar sugar factory संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने दुपारपर्यंत सात जागांवर विजय मिळविला. यंदा प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या भाजप पुरस्कृत पॅनलला दुपारपर्यंत एकही जागा जिंकता आलेली नाही. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ncp पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार सुमारे १५ हजाराच्या मताधिक्क्याने निवडून आल्याने समर्थकांचा मोठा जल्लोष सुरु आहे. someshwar-sugar-factory-election-final-result-2021-baramati-pune-latest-news-sml80

someshwar vikas panel
अनिकेत जाधवची भारतीय संघात निवड; फुटबॉल पंढरीत जल्लाेष

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमाेजणी बारामती शहरातील कृष्णाई लॉन्स येथे सकाळी आठपासून सुरु आहे. ही मतमाेजणी सुमारे ४२ टेबलांवर सुरु आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास एकेक निकाल कानी आल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पॅनलच्या समर्थकांनी मतमाेजणी केंद्राबाहेर जल्लाेष करण्यास प्रारंभ केला हाेता. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या समर्थकांनी पवार साहेब जिंदाबादच्या घाेषणा देत विजयी वाटचाल सुरु राहणार असल्याचे सांगितले.

आत्तापर्यंतच्या (दुपारी साडे चार) मतमाेजणीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने सात जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप प्रणित पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही. दरम्यान सायंकाळी आठ पर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर हाेतील. या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनेलच्या हाती काही लागणार का याची चर्चा रंगली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.