धक्कादायक! जावयाने सासऱ्याला कालव्यात ढकललं; मृतदेह काढताना लहान भाऊही बुडाला

Bhanara Crime : आरोपी अनिल याने सासरे हरी यांना कालव्यात ढकलले. त्यामुळे खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
Bhandara Crime News in Marathi, Bhandara Latest Marathi News
Bhandara Crime News in Marathi, Bhandara Latest Marathi NewsSaam Tv

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात (Bhandara Pavani Tahsil) एक धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील सिंधी येथे राहणाऱ्या सासऱ्याला जावयानेच कालव्यात ढकलून दिलं आहे. या घटनेत सासऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर, भावाचा मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उडी घेतलेल्या लहान भावाचाही मृत्यू झाला. रविवारी (1 मे) सायंकाळच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pavani Police) जावयाला अटक केली आहे. (Bhandara Crime News in Marathi)

Bhandara Crime News in Marathi, Bhandara Latest Marathi News
धरणात बुडालेल्या माय- लेकींचे मृतदेह सापडले; दगडपारवा गावावर शोककळा

हरी गोविंदा नागपुरे (वय 65) व चंद्रभान गोविंदा नागपुरे (वय 55) रा. सिंधी ता. पवनी अशी या मृत भावांची नावे आहेत. तर, अनिल नारायण हटवार (वय 40) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याने सासरे हरी यांना कालव्यात ढकलले. त्यामुळे खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच हरी यांचा लहान भाऊ चंद्रभान यांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, कालव्यात पाणी जास्त असल्याने चंद्रभान देखील कालव्यात बुडाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही सख्या भावाचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे आरोपी जावयाने सासऱ्याला कालव्यात का ढकलले याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अनिल नारायण हटवार यास अटक केली असून पुढील तपास पवनी पोलीस करत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com