Solapur: डोक्यात दगड घालून आईचा निर्घृण खून; मुलगा फरार
Solapur: डोक्यात दगड घालून आईचा निर्घृण खून; मुलगा फरारविश्वभूषण लिमये

Solapur: डोक्यात दगड घालून आईचा निर्घृण खून; मुलगा फरार

संशयित मुलगा फरार

विश्वभूषण लिमये

सोलापूर: जन्मदात्या आईच्याच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोलापुरातील बार्शीमध्ये Barshi Solapur घडली आहे. पोटच्या मुलानेच आईचा अशा प्रकारे निर्घृण खून केल्याने परिसरात खळबळ झाली आहे. तर, खून केल्यानंतर मुलाने पळ काढला असून पोलिसांनी त्याची संशयित आरोपी म्हणून नोंद केली आहे. सोलापूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

हे देखील पहा-

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 रा. वाणी बार्शी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21) असे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता, घराच्या कपाऊंड मध्ये 2-3 दिवसांपासून तेथेच मृत अवस्थेत झुडपामध्ये पडलेली असल्याचे आढळून आले. मृतदेह रुक्मिणी नागनाथ फावडेचाच असल्याचे तिच्या पतीने सांगितले आहे.

Solapur: डोक्यात दगड घालून आईचा निर्घृण खून; मुलगा फरार
Latur: किनीथोट शिवारात शेतातील सोयाबीन अज्ञातांनी जाळले

मृत महीला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम हे दोघेजण सदर ठिकाणी राहत होते. तर घरात नेहमी भांडण होत असल्याने त्यांचा लहान मुलगा व पती हे बार्शी शहरातील डंबरे गल्ली येथे वेगळे राहत होते. तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी म्हणजेच मोठा मुलगा व मृत रुक्मिणी यांच्यात पैशावरुन नेहमी वाद होत असत. त्या बाबत पोलीस स्टेशनला तक्रारीही दाखल होत्या.

मृत महिलेचे पती नागनाथ फावडे व त्यांचा लहाण मुलगा लक्ष्मण यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेटस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरण्याचे कपडे त्याने नेल्याचे लक्षात आलं. यापुर्वीही त्याने आईस व भावास मारहाण केली होती त्यामुळेच त्यानेच आईचा डोक्यात दगड घालुन जिवे ठार मारले असा संशय आहे. दरम्यान, संशईत आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.