स्पंदन स्फुर्ती फायनांसमध्ये कर्जाच्या अफरातफरीमुळे तिघांना अटक

कर्जाच्या अफरातफरीमुळे तिघांना अटक
स्पंदन स्फुर्ती फायनांसमध्ये कर्जाच्या अफरातफरीमुळे तिघांना अटक
स्पंदन स्फुर्ती फायनांसमध्ये कर्जाच्या अफरातफरीमुळे तिघांना अटकअभिजीत घोरमारे

भंडारा : वसूल केलेल्या कर्जाची रक्कम ग्राहकाच्या कार्ड मध्ये नोंद करून, सुद्धा या रकमेची संगणकात नोंदणी न करता तब्ब्ल १ लाख १३ हजार ८३९ रुपयांची अफरातफर करण्याच्या प्रकार स्पंदन स्फुर्ती फायनांसमध्ये उघडकीस आला आहे. Spandan Sfurti Finance Debt Arresteddvj97

या प्रकरणात कंपनी असिस्टेंट व्हाइस प्रेसिडेंसच्या तक्रारीनुसार कंपनीत काम करणाऱ्या तिघांविरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राहुल मेंढे (वय- २६), लोकेश हडके (वय-२५), अभिलाष खेड़कर (वय- २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

हे देखील पहा-

भंडारा शहरात गुजराती कॉलनीत स्पंदन स्फुर्ती फायनांस कार्यालय असून, हे तिघेही त्या कंपनी मध्ये काम करतात, त्यांनी कर्ज धारकांकड़ून रककमेची वसूली केली आहे. कर्जदारांच्या लोन कॉर्ड वर नोंद केली आहे. मात्र, ऑफिसच्या संगणकात नोंद केलेली नाही. Spandan Sfurti Finance Debt Arresteddvj97

स्पंदन स्फुर्ती फायनांसमध्ये कर्जाच्या अफरातफरीमुळे तिघांना अटक
HDFC बँकेकडून कर्जाच्या दरात कपात

हा प्रकार वर्षापासून सुरू होता. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. अखेर झालेल्या ऑडिटमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. असिस्टेंट व्हाइस प्रेसिडेंस राकेश साहू यांच्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com