shekhar sinh, satara , Aadhar Card , Voter ID card
shekhar sinh, satara , Aadhar Card , Voter ID card saam tv

Satara : मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करा; साता-यात विशेष माेहिम

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील मतदारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सातारा : मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी विद्यमान मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड (aadhar card) संलग्न करण्यासाठी येत्या एक ऑगस्ट पासून (satara) सातारा जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी दिली. (satara latest marathi news)

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले या विशेष मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.

मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी (ERO Net), (GARUDA), (NVSP), (VHA) या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र 6 ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले.

shekhar sinh, satara , Aadhar Card , Voter ID card
...तरच जवानास अपंगत्व निवृत्ती वेतन : सर्वोच्च न्यायालय

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. 6 ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्टकार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, (NPR) अंतर्गत (RGI) द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार /खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.

shekhar sinh, satara , Aadhar Card , Voter ID card
विसरू नका, मी काय कांड केले माहितीहेत ना ! सेनेच्या महिला संघटकाचा एकनाथ शिंदे गटास इशारा

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीतजास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

shekhar sinh, satara , Aadhar Card , Voter ID card
Karad : एटीएमच्या ठिक-या; एसपींनी 'त्या' डॅशिंग पाेलिसांना दिलं दहा हजार रुपयांचे बक्षीस
shekhar sinh, satara , Aadhar Card , Voter ID card
Harshada Garud : एशियन वेटलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या हर्षदा गरूडनं पटकाविलं 'सुवर्ण'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com