रत्नागिरी जिल्हाधिकारी पाटील यांचा शासनाकडून विशेष गौरव

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधानसचिव यांनी डॉ.बी.एन पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी पाटील यांचा शासनाकडून विशेष गौरव
रत्नागिरी जिल्हाधिकारी पाटील यांचा शासनाकडून विशेष गौरवSaam TV

रत्नागिरी : कोरोनाकाळात (Coronavirus) उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोरना नियंत्रणनासाठी उल्लेखनीय अशी कामगिरी केली. त्याचबरोबर चिपळूण आणि खेड यासह जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान केलं त्याचं आव्हानही जिल्हाधिकारी यांच्यासमोर होतं या दोन्ही आव्हानांचा सामना करत योग्य नियोजन त्यांनी केलं. याची दखल राज्य शासनाच्या आरोग्यविभागानं घेतली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधानसचिव यांनी डॉ.बी.एन पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी पाटील यांचा शासनाकडून विशेष गौरव
तिरंदाजीत भारताच्या ज्योतीस 'सुवर्ण'; कोरियाचा १ गुणाने पराभव

दरम्यान राज्यात मागच्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. या संकटाच्या काळात प्रशाकीय सेवेतील अनेक लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलं. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव देखाल गमवावा लागला. प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने आपआपल्या जिल्ह्यात विशेष काम करुन कोरोनाला थोपावण्याचे काम केलं. आणि त्याचाच परिणाम आज आपण कोरोनातून मोठ्या प्रमाणात सावरलो आहोत. या काळात राज्यसरकारने कोविड योद्धा म्हणून अनेकांचा सन्मान केला. परंतु रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा हा सन्मान विशेष आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com