रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते; खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण

खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ
nashik news
nashik newsSaam Tv

नाशिक - स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक (Nashik) शहरातले रस्ते खड्डेमय झालेत. शहरातील सिडको, म्हसरूळ, गंगापूर रोड, आडगावसह सर्वच परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं या खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झालेत.

जागोजागी पडलेले खड्डे, त्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करणारे नाशिककर आणि जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत झालेली वाढ. स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिकचे रस्ते सध्या खड्ड्यात गेलेत. केवळ शहरातीलच नव्हे तर मुंबई नाशिक महामार्गाचीही अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे चाळण झालीय. खड्ड्यात साठणारं पावसाचं पाणी आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अनेक दुचाकीचालकांचा अपघात होतोय. अनेक ठिकाणी या खड्ड्यांतून वाहनं चालवणं कठीण झालंय.

हे देखील पाहा -

शहरात खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी बिकट परिस्थिती झाली असून खड्ड्यात गाडी आदळल्यानं गाड्यांचंही नुकसान होतंय. खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याचे, पाठीचे आजार वाढलेत. दरवर्षी नेमेची येतो पावसाळा, तसे दरवर्षी नाशिकचे रस्तेही खड्डयात जात असल्यानं दरवर्षी शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनतो. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी करूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

nashik news
मंत्री नसल्याचा सर्वात जास्त आनंद मला - धनंजय मुंडे

दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करून तयार केले जाणारे रस्ते एकाच पावसाळ्यात खड्डेमय होत असल्यानं रस्त्यांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. अनेक ठिकाणी खड्ड्यात माती अथवा मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जात असली, तरी पावसात माती वाहून जात असल्यानं खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे चं बनतो. तर दुसरीकडे शहरात स्मार्ट रस्त्यांच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळेही खड्ड्यांच्या समस्येत भर पडलीय. त्यामुळे नाशिककरांचा शहरातील प्रवासही त्रासदायक बनलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com