नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

विद्यापीठाच्या ता. 13 जुलै रोजी नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आलेल्या ज्या परीक्षा या सुधारित वेळापत्रकानुसार पुन्हा घेण्यात येणार आहेत.
नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
नांदेडचे स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत उन्हाळी- 2021 सर्व पदवी, पदव्युत्तर व अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ता. 13 जुलै, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ता. 20 जुलै व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ता. 26 जुलै पासून प्रस्तावित होत्या. या परीक्षेची पूर्वतयारी परीक्षा विभागाने अतिशय चोखपणे केली होती. Srtm- University -exams- in- Nanded -postponed

ह्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी बाहेरच्या एजन्सी काम देण्यात आले होते. त्या एजन्सीमार्फत ता. 13 जुलै रोजी ऑनलाइन परीक्षेची सुरुवात झाली मात्र या ऑनलाइन परीक्षेदरम्यान एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

यानंतर ता. 13 जुलै रोजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाची तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीतील एका ठरावानुसार नियोजित ता. 13 जुलैपासून सुरु झालेल्या उन्हाळी- 2021 पदवी अभ्यासक्रम अंतिम परीक्षेच्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - नंदुरबारात विद्यार्थ्यांमध्‍ये उत्‍साह; नियम पाळत वर्ग सुरू

विद्यापीठाच्या ता. 13 जुलै रोजी नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आलेल्या ज्या परीक्षा या सुधारित वेळापत्रकानुसार पुन्हा घेण्यात येणार आहेत. विद्यापीठांतर्गत होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ता. 13 जुलै, ता. 20 जुलै व ता. 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.

महाविद्यालयीन स्तरावर क्लस्टर पद्धतीने देण्यात येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी, परीक्षा केंद्र प्रमुखांनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नोंद घेऊन संबंधित विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. रवी सरोदे यांनी कळवले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com