SSC Exam: हम नही मानेंगे! पहिल्याच दिवशी राज्यभरात १०वीच्या विद्यार्थींनी कॉपी करत लिहिला पेपर,आकडेवारी आली समोर

एकूण कॉपीच्या ९ प्रकरणांची नोंद झाली आहे.
SSC Exam
SSC ExamSaam Tv

सचिन जाधव

SSC Exam: दहावीच्या लेखी परीक्षेला काल (२५ मार्च) पासून राज्यभरात सुरुवात झाली आहे. परीक्षा सुरू होताच पहिल्याच दिवशी कॉपीची अनेक प्रकरणे समोर आलीत. राज्य शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेत काल पहिलाच मराठी भाषेचा पेपर होता. यामध्ये एकूण कॉपीच्या ९ प्रकरणांची नोंद झाली आहे. (Latest SSC students copy in exam News)

पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती या विभागीय मंडळात कॉपीच्या काही नोंदीचा अपवाद वगळता इतर विभागांत कॉपीच्या प्रकाराची नोंद नसल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून नोंदवण्यात आली आहे. यात पुणे विभागीय मंडळात सर्वाधिक ५, त्यानंतर नागपूरमध्ये २ आणि नाशिक,अमरावती विभागात प्रत्येकी १ प्रकरण नोंदली गेली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

SSC Exam
SSC Exam: भरारी पथकांची संख्‍या वाढविली; धुळे शिक्षण विभागाचा निर्णय

दहावीचा शेवटचा पेपर २५ मार्च २०२३ रोजी आहे. कोविडच्या दोन वर्षांनंतर आता परीक्षा सुरळीत सुरू झाल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे कॉपी करूनये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. महसूल विभागाकडून बैठ्या पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. यंदा १० वी परीक्षेला महाराष्ट्रातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com