SSC-HSC Board Result 2023 : दहावी-बारावीच्या निकालातील विलंब टळला; 'या' महिन्यात लागणार निकाल

दहावीचा निकाल १० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल २ जूनपूर्वी लागणार, असं बोर्डामार्फत सांगण्यात आलं आहे.
SSC Exam Result 2023 news updates
SSC Exam Result 2023 news updatesSaam TV

SSC-HSC Board Result 2023 : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. अशात जुन्या पेश्नन योजनेमुळे पेपर तपासणीच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालात विलंब होण्याची शक्यता आहे. अशात बोर्डाने निकालाची तारीख सांगितली आहे. दहावीचा निकाल १० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल २ जूनपूर्वी लागणार, असं बोर्डामार्फत सांगण्यात आलं आहे. (Marathi News)

या वर्षी इयत्ता दहावीचे १४ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तसेच बारावीचे १५ लाख ३० हजार विद्यार्थींनी परीक्षा दिली आहे. कोरोना महामारीमुळे ‘शाळा तेथे केंद्र’ अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशात यंदा बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त घेण्यात आल्या आहेत. काही अपवाद वगळता पेपर फुटीच्या घटना नियंत्रित आल्या आहेत.

SSC Exam Result 2023 news updates
SSC Exam 2023 : दहावीचा गणिताचा पेपर पुण्यात फुटला ? बिबवेवाडी पोलिस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल

दहावी-बारावीचे निकाल वेळेतच जाहीर होणार

इयत्ता दहावी-बारावीचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी बोर्डाची तयारी सुरू झाली आहे. निकाल उशिरा लागल्यास त्याचा थेट परिणाम पुढील प्रवेशावर होतो. त्यामुळे अशी अडचण येऊ नये अशा पद्धतीने बोर्डाने काम सुरू केले आहे.

जूनमध्ये घेतली जाणार पुरवणी परीक्षा

काही अडचणींमुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यातील बोर्डाच्या परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना बसता आले नाही. त्यामुळे निकालात ते अनुर्तीर्ण होतील. अशा विद्यार्थ्यांची जूनअखेरीस पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे.

SSC Exam Result 2023 news updates
HSC - SSC Board Exams: दहावी-बारावीच्या निकालांना फटका बसणार? उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com