SSC-HSC Exam 2023: दहावी-बारावी परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट; निकाल कधी लागणार?

SSC-HSC Exam 2023 Latest News : बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकल जून महिन्याच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
SSC-HSC Exam 2023
SSC-HSC Exam 2023 Saam TV

SSC HSC Exam Result Update : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावी बोर्डाचे परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार अशी माहिती मिळाली आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या (Exam) उत्तरपत्रिकांची तपासणी शिक्षक, शिक्षेतर संघटनांनी संप पुकारला होता. त्यानंतर आता उत्तरपत्रिका पत्रिका तपासण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याने निकाल वेळेत लागणार आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेची पेपर तपासणीची डेडलाईन १५ एप्रिल असणार आहे. तर त्यााधी बारावीचे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

SSC-HSC Exam 2023
RCB VS MI : दिलदार मुंबईकर! तब्बल 'इतक्यांदा' दिली पहिली मॅच देवाला..

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, संप मागे घेतल्याने दहावी-बारावीचा निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चच्या काळात झाल्या. यंदा दहावीच्या परीक्षेला १५ लाख,७७ हजार, २५६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२३ या काळात आयोजित करण्यात आला आहे. बारावीच्या बोर्डाची परीक्षेस राज्यात १४ लाख ५७ हजार २९३ परीक्षेस बसले होते.

SSC-HSC Exam 2023
Video : काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना; नेत्यांसह अचानक कोसळला स्टेज

दरम्यान, यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये अनेक नियम बदलले होते. या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी कठोर नियम जाहीर केले होते. मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर विकत घेतला तर परीक्षा रद्द केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं निलंबन केलं जाईल, असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com