दहावी आणि बारावी निकालांच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कधी?

दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत.
दहावी आणि बारावी निकालांच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कधी?
SSC, HSC Results Saam Tv

भूषण शिंदे

पुणे : १० वी, १२ वीच्या परीक्षेचा निकाल (SSC, HSC Results) लवकरच लागणार आहे. या परीक्षेची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. यामुळे दहावीचा (SSC) निकाल १० जूनपर्यंत तर, बारावीचा (HSC) २० जूनला लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

हे देखील पाहा-

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल (Results) जाहीर केला जात असतो. यावर्षी दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यामधील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

SSC, HSC Results
पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, नवज्योत सिंग सिद्धू पक्ष बदलण्याच्या तयारीत

तसेच कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका न तपासता ते परत केले होते. यामुळे या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीवर परिणाम होण्याची भीती होती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम व्यवस्थित सुरू होते.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.