उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर

ऑनलाईन पद्धतीने 1 वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार निकाल
उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर
उद्या दहावीचा निकाल होणार जाहीरSaam Tv

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC ans HSC Board) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10 वी च्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुंबईत ही माहिती दिली, दहावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे,

दहावीचा निकाल विद्यार्थी अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.

यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा कोविड -१९ मुळे रद्द झाली होती, विद्यार्थ्यांची मागील कामगिरी विचारात घेऊन पर्यायी मूल्यांकन निकषांवर आधारित निकाल जाहीर करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता,  त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल तयार करण्यात आला आहे, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624  विद्यार्थी पात्र होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com