Karad : सवंगड्याचा बुडून मृत्यू; दहावीतील मित्रांवर शाेककळा

या घटनेमुळे मलकापूर गावात शाेककळा पसरली हाेती.
Drown, Karad, SSC Students
Drown, Karad, SSC Students saam tv

SSC Exam 2023 : आज इयत्ता दहावीची परिक्षेचा (ssc exam 2023) पहिला पेपर आहे. परिक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीचा उत्साह असताे. परंतु कराड (karad news) तालुक्यातील मलकापूरात (malkapur) मात्र आजही काही परिक्षा केंद्रावर निरव शांतता असल्याचे चित्र आहे. याचे कारण म्हणजे आपल्यातल्याच एका सवंगड्याचा अचानक झालेला दुर्देवी मृत्यू. मित्राच्या आठवणींनी विद्यार्थ्यांसह (students) पालक गहिवरल्याचे चित्र आहे. (Satara Latest Marathi News)

Drown, Karad, SSC Students
Karad : कराड - मलकापूर उड्डाणपूल पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; जाणून घ्या वाहतुक मार्गातील नवा बदल

मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालयातील (anandrao chavan vidyalay) इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोयना नदीपात्रात बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यानंतर त्याची शाेधा शाेध सुरु हाेती. (Maharashtra News)

तब्बल तीन दिवसांनंतर बुडालेला राहुल गणेश परिहार (रा. आगाशिवनगर, ता. क-हाड) या विद्यार्थ्याचा जुन्या कोयना पूलाजवळ मृतदेह आढळला. या दुर्घटनेमुळे आगाशिवनगर- मलकापूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Drown, Karad, SSC Students
Udayanraje Bhosale News : दोन दिवसात धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अन्यथा.., उदयनराजेंचा सरकारला इशारा

आनंदराव चव्हाण विद्यालयाचा दहावीचा निरोप समारंभ शनिवारी झाला. राहूल हा रविवारी त्याच्या फ्रेंडस बराेबर पोहायला गेला होता. नदीत पोहताना राहुल बुडाला. त्याच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. राहुलच्या कुटुंबियांसह पाेलिसांनी त्याच शाेध सुरु केला.

परंतु ताे सापडला नाही. तब्बल तीन दिवसांनी राहूलचा मृतदेह घटनास्थळावरून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आढळला अशी माहिती पाेलिसांनी दिली. राहूलचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटंबियांनी हंबरडा फाेडला.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com