SSC Class 10th Result 2021: कोकण अव्वल तर राज्याचा निकाल 99.95 टक्के

हावीच्या परीक्षेचा निकाल कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. आज (१६ जुलै) ऑनलआईन पध्दतीने दुपारी एक वाजता ऑनलआईन पध्दतीने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
SSC Class 10th Result 2021: कोकण अव्वल तर राज्याचा निकाल 99.95 टक्के
SSC Class 10th Result 2021: कोकण अव्वल तर राज्याचा निकाल 99.95 टक्केSaam Tv

पुणे - दहावीच्या परीक्षेचा निकाल कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. आज (१६ जुलै) ऑनलआईन पध्दतीने दुपारी एक वाजता ऑनलआईन पध्दतीने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल विक्रमी म्हणजेच 99.95 टक्के लागला आहे. मुलांचा निकाल 99.93 टक्के इतका आहे, त्यामध्ये, कोकणच्या विभागाचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. हि माहिती पुणे शिक्षण मंडळाची पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

हे देखील पहा-

दहावीची लेखी परीक्षा राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही परीक्षा मताने रद्द करण्यात आली. शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी अनेक बैठकीनंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले.

त्यानुसार संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी शाळांना २३ जून २०२१ ते ९ जुलै २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याप्रमाणे शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्याचे काम सुरु झाले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून देण्यात आलेले अंतर्गत गुण एकत्रित केले आणि विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवला.

SSC Class 10th Result 2021: कोकण अव्वल तर राज्याचा निकाल 99.95 टक्के
40 गावकरी विहिरीत कोसळले ! चौघांचा मृत्यू

देण्यात येणाऱ्या गुणांची पद्धत:

लेखी परीक्षा न झाल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा नववीचा या गुणांच्या आधारे देण्यात आला आहे- अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन तसेच दहावीचे अंतिम तोंडी गुण, विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकांचे गुण आणि त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे या निकालासाठी विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com