Bus Accident : उदय सामंत यांच्यासमोरच एसटी बसला अपघात, उद्योगमंत्री खाली उतरून प्रवाशांच्या मदतीला धावले

Uday Samant : अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उदय सामंत यांनी स्व:ताच्या एस्कॅार्ट करणाऱ्या कारमधून रुग्णालयात पाठवले.
Bus Accident
Bus AccidentSaam TV

Ratnagiri News :

रत्नागिरी-महाड-वसई एसटी बसचा हातखंबा येथे अपघात झाला आहे. रत्नागिरीहून महाड दौऱ्यावर जाताना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समोरच हा अपघात झाला. अपघातस्थळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः कारमधून उतरून मदत केली.

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उदय सामंत यांनी स्व:ताच्या एस्कॅार्ट करणाऱ्या कारमधून रुग्णालयात पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीहून महाडच्या दौऱ्यावर जात होते. त्यावेळी हातखांबा येथे त्यांच्या कारच्या समोरच रत्नागिरी-वसई एसटी बसला अपघात झाला.

Bus Accident
Nashik Accident News: मुंबई- आग्रा महामार्गावर कार- कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

बसमध्ये एकूण २१ प्रवासी अडकले होते. आपघात पहिल्यानंतर उदय सामंत स्वतः कारमधून खाली उतरले आणि अपघातग्रस्त प्रवाशांना मदत सुरू केली. उदय सामंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह एसटी बसमध्ये अडकलेल्या २१ लोकांना सुखरूप बाहेर काढले. (Accident News)

उदय सामंत यांचा महाडचा दौरा नियोजित असताना एसटी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ आपल्या एस्कॅार्ट करणाऱ्या कारमधून हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या तात्काळ मदती बद्दल एसटी अपघातात सापडलेल्या प्रवाशांनी आभारही मानले. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com