कालच ६०५६ रुपये पगार झाला, आज एसटी कर्मचाऱ्याने दरीत उडी मारुन आयुष्य संपवलं!

एसटी महामंडळासाठी पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ST Employee Suicide Case
ST Employee Suicide CaseSaam Digital News

रोहिदास गाडगे

माळशेज : एसटी कर्मचाऱ्यांचा संपाची (ST bus strike) झळ अनेक कर्मचाऱ्यांना बसलीय. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचा आवाज गेले सात- आठ महिने राजकीय वर्तुळासह मंत्रालयात दुमदुमला. एसटीचे विलीनीकरण राज्य शासनामध्ये करण्याची मागणीही जोर धरु लागली होती. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या (St bus employee suicide) रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक बैठका घेण्यात आल्या. तसेच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरही तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी (mva government) सरकारनं कर्मचाऱ्यांशी चर्चा केली . मात्र, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे सर्वच एसटी कर्मचाऱ्यांचे समाधान झालेच असे नाही. कारण, एसटी महामंडळासाठी (ST Bus Corporation) पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ST Employee Suicide Case
एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; ईडीने दिलेल्या नोटिसला हायकोर्टाने दिली स्थगिती

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील अकोले आगारात काम करणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्याने माळशेज घाटात (Malshej Ghat) आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. माळशेज घाटात दरीत उडी मारून एसटी कर्मचाऱ्याने जीवन संपवलं आहे. अकोले आगाराचे वाहक गणपत मारुती इदे, असे आत्महत्या केलेल्या (Suicide case) एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. गणपत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील रहिवासी होते.

ST Employee Suicide Case
काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी यादी जाहीर; 'या' दोन नेत्यांना मिळणार संधी

कालच मंगळवारी एसटी कर्माचरी गपपत यांचा वेतन झाला होता आणि आज त्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं, या घटनेमुळं परिसरात हळहळ वक्य होत आहे. एसटी संपानंतर ड्युटी मिळत नसल्याने पगार कमी झाला. ६०५६ रुपये एवढाच पगार झाल्याने कुटुंबाची आर्थिक ताणाताण झाली. या कारणामुळे एसटी कर्माचरी गपपत यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com