भंडारा आगारातील एसटी बसेस हायटेक VTS यंत्रणेसह सज्ज!

भंडारा आगारातील एसटी बसेसमध्ये अत्याधुनिक VTS यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना बससाठी ताटकळत थांबण्याचा त्रास कमी होणार आहे. बसस्थानकावरील डिस्प्ले बोर्ड वरून बस लोकेशन समजणार आहे.
भंडारा आगारातील एसटी बसेस हायटेक VTS यंत्रणेसह सज्ज!
लातुरात VTS यंत्रणा कार्यान्वित, 504 बसेसची माहिती कळणार एका क्लिकवरSaamTv

भंडारा - भंडारा बस स्थानकावर "व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम’ VTS लावल्याने आता बसचे लोकेशन प्रवाशांना त्वरित समजणार आहे. भंडारा एसटी आगाराने बसेसला लावलेल्या  ट्रॅकिंग सिस्टममुळे बसस्थानकावर लालपरीचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना दिसणार असून नेमके लोकेशेन मिळाल्याने प्रवाशांचा बससाठी ताटकळत थांबण्याचा त्रास कमी होणार आहे.

भंडारा बसस्थानकावर गेल्यानंतर अनेकदा बसची वाट पाहत थांबावे लागायचे. बाहेरगावावरून येणाऱ्या बसला किती वेळ आहे हे समजू शकत नव्हते. परंतु ‘व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम’ (व्हीटीएस) मुळे आता बसचे लाईव्ह लोकेशन कळणार असून प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत बसण्याची गरज नाही. व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीमचे डिव्हाईस एसटी बसेसमध्ये लावण्यात आलेली आहेत.

हे देखील पहा -

ही डिव्हाईस भंडारा आगारातील कार्यालयातील मेन सर्व्हरला जोडलेली आहेत. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांना गाडीचा स्पीड कळतो. तसेच प्रवाशांना नेमकी बस कुठे आहे याची माहिती कळते. चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यास त्याची माहितीही एसटीच्या अधिकाऱ्यांना मिळते. तसेच चालकाने गाडी बायपासने नेली की नाही हे सुद्धा समजण्याची व्यवस्था VTS प्रणालीमध्ये आहे. त्यामुळे व्हीटीएस सिस्टीम एसटीचे अधिकारी आणि प्रवाशांसाठी सोयीची ठरत आहे.

भंडारा आगारातील विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडस्कर यांनी साम वाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, बस नेमकी कुठे आहे हे प्रवाशांना समजण्यासाठी बसस्थानकावर मोठे स्क्रीन लावण्यात आली आहे. बसला स्थानकावर येण्यासाठी किती वेळ आहे याची माहिती या स्क्रीनच्या माध्यमातून प्रवाशांना होते. त्यामुळे प्रवाशांना बसची चौकशी करण्यासाठी चौकशी कक्षात जाण्याची आता गरज नाही.

लातुरात VTS यंत्रणा कार्यान्वित, 504 बसेसची माहिती कळणार एका क्लिकवर
रॉकेल मिश्रीत बायोडिझेलची विक्री; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात

व्हीटीएस सिस्टीममुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्हीटीएस सिस्टीममुळे चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यास त्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांना मिळत असल्यामुळे चालकांच्या निष्काळजीपणाला चाप बसला असून बसची वेळ पाळणेही शक्य झाले आहे. एवढेच नव्हे तर प्रवाशाने चालक किंवा वाहकाची तक्रार केल्यास त्वरीत कारवाई होणार आहे. शिवाय या यंत्रणेचे ऍप देखील मोबाईलमध्ये इंस्टॉल करता येत असल्याने संपूर्ण बस आगारच मोबाइल मध्ये आले आहे!

त्यामुळे काळानुरूप राज्य परिवहन महामंडळ हायटेक होत असून प्रवाशांना देखील याचा लाभ होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com