ST बंदमुळे TET परिक्षेवर परिणाम; वेळेत न पोहचल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेस मूकले!

राज्यभरात विविध ठिकाणी टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. वेळेत न पोहचल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला.
ST बंदमुळे TET परिक्षेवर परिणाम; वेळेत न पोहचल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेस मूकले!
ST बंदमुळे TET परिक्षेवर परिणाम; वेळेत न पोहचल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेस मूकले!SaamTvNews

आज राज्यात शिक्षक पात्रतेसाठी घेण्यात येणारी टीईटी (TET) परीक्षा होत आहे. दोन वेळा या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. सुरुवातीला १० ऑक्टोबर २०२१ ऐवजी ३० ऑक्टोबर २०२१ रोजी टीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी होणारी टीईटीची परीक्षा आज होत आहे. मात्र, महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कमर्चाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा मोठा परिणाम या परीक्षेवर राज्यात सर्वदूर पाहायला मिळाला.

हे देखील पहा :

एसटी बंदमुळे टीईटी परिक्षेवर परिणाम झाल्याचं दिसून आले. राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आणि वेळेत परीक्षा केंद्र गाठण्यासाठी त्रास झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. खाजगी वाहनांनी विद्यार्थ्यांना प्रवास करून परीक्षा गाठावी लागली. एसटी बंद असल्यामुळे दूरवर आलेल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेत पोहचू शकले नाहीत. परिणामतः अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी या परीक्षेस मुकले.

नांदेड : नांदेड शहरातील 84 परिक्षा केंद्रावर 24,839 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. टीईटी परिक्षा चार वेळा रद्द झाली होती. अखेर ही परिक्षा आज होत असल्याचं समाधान असलं तरी अनेक विद्यार्थ्यांनी कालच नांदेड गाठून लाॅज तसेच इतर ठिकाणी पर्यायी मुक्काम केला. तर अनेकांनी दुचाकी वर येणं पसंत केलं. तर काही जणांना ज्यादा पैसे देऊन खाजगी वाहनं करुन परीक्षेला यावं लागलं आहे. दुर्गम भागातील अनेकांना पर्यायी वाहनाची व्यवस्था नसल्याने व हक्काची लालपरी बंद असल्याने परिक्षेपासून वंचित रहावे लागले आहे.

ST बंदमुळे TET परिक्षेवर परिणाम; वेळेत न पोहचल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेस मूकले!
TET Exam : बीड जिल्ह्यात 12 हजार 447 परिक्षार्थी देणार टीईटी परीक्षा!

नाशिक : नाशिक शहरातील द्वारका परिसरातील रवींद्र विद्यालय येथे टीईटी परीक्षा केंद्रावर वेळेत न आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात घेण्यास मज्जाव करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेश न दिल्याने व गेट बंद केल्याने पोलिसांना विनवणी करताना अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहावयास मिळाले. तर, वेळेत आलो तरी परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही असा केला आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. - सागर गायकवाड

कोल्हापूर : कोल्हापुरातील अनेक टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. टीईटी परीक्षेसाठी वेळेत येऊनही प्रवेश न दिल्याचा आरोप याही ठिकाणी विद्यार्थ्यांनी केला आहे. एसटी संप आणि पावसामुळे अनेक विद्यार्थी कसरत करत परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते. एकूणच या सर्व गोंधळात आमच्या नुकसानीला जबाबदार कोण? असा केला सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com