...तर मग शासनाप्रमाणे वेतन द्या पगार 7 तारखेला करा; अलिबाग आगार कर्मचारी

अलिबागसह रायगडातील आठही आगारातील एसटी कर्मचारी हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
...तर मग शासनाप्रमाणे वेतन द्या पगार 7 तारखेला करा; अलिबाग आगार कर्मचारी
...तर मग शासनाप्रमाणे वेतन द्या पगार 7 तारखेला करा; अलिबाग आगार कर्मचारी Saam TV

राजेश भोस्तेकर

रायगड: विलनीकरण शक्य नसेल तर आम्हाला शासनाप्रमाणे वेतन द्यावे आणि 7 तारखेला पगार खात्यात जमा करण्याची हमी द्यावी अशी मागणी अलिबाग आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज नववा दिवस असून अद्यापही संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. अलिबागसह रायगडातील आठही आगारातील एसटी कर्मचारी हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनीच शासनासमोर तोडगा ठेवला असून यावर तरी शासन निर्णय घेणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल आजही सुरूच आहेत.

...तर मग शासनाप्रमाणे वेतन द्या पगार 7 तारखेला करा; अलिबाग आगार कर्मचारी
'ती' घड्याळं दीड कोटीची अन् जप्त झाली नाहीत; हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण

रायगड जिल्ह्यातील आठही आगारातील एसटी कर्मचारी हे संपावर आहेत. आज नववा दिवस असून लालपरी आजही आगारात उभी आहे. जिल्ह्यातील 19 एसटी कर्मचारी यांना प्रशासनाने निलंबित केले आहे. शासनस्तरावर ठोस असा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कर्मचारी हे संप सोडण्यास तयार नाहीत. एसटी कर्मचाऱ्याचा संपात आता राजकारण आले असून त्यामुळे कर्मचारी हा भरटला जात आहे. एसटी महामंडळाचे विलनीकरण शक्य नसेल तर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन द्यावे आणि पगार सात तारखेला खात्यात जमा होईल याची शास्वती द्यावी. महामंडळाकडे पैसे नसतील तर पगार शासनाने करावे अशी मागणी अलिबागमधील कर्मचार्यांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com