ST Employee: 'बांगड्या विकू, मात्र आंदोलन सुरुच राहील', एसटी कर्मचाऱ्यांनी शोधला जगण्यासाठी पर्यायी मार्ग

गेल्या दोन महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
ST Employee: 'बांगड्या विकू, मात्र आंदोलन सुरुच राहील', एसटी कर्मचाऱ्यांनी शोधला जगण्यासाठी पर्यायी मार्ग
ST EmployeeSaam Tv

कैलाश चौधरी -

उस्मानाबाद: गेल्या दोन महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी राज्यसरकारचे सर्व प्रयत्न फसले आहेत. पगारवाढीच्या आमिषाला आणि निलंबन, बडतर्फ अशा कारवाईला न घाबरता आंदोलनाची धग अद्यापही कायम ठेवत या कर्मचाऱ्यांनी नोकरीव्यतिरिक्त पर्यायी मार्ग शोधायला सुरुवात केली आहे (ST Employee explored alternative ways to survive like selling bangles).

ST Employee
Nagpur ST Strike: नागपुरातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची इच्छा मरणाची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र

बांगड्या विकून प्रपंच भागवू मात्र आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार एसटी (ST) कर्मचारी संतोष राऊत यांनी केलं आहे. मकर संक्रांती निमित्त हंगामी व्यवसाय म्हणून राऊत यांनी काचेच्या बांगड्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बंद (ST Strike) असल्याने मागील दोन महिन्यापासून पगार नाही.

ST Employee
St Strike: एसटी कर्मचाऱ्यांची कामाकडे पाठच; आवाहनानंतरही आंदोलन सुरूच

कुटुंबात एकूण सात माणसं आहे. त्यात तीन मुलांचे शिक्षण त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बांगडी विकण्याचा निर्णय घेतला. गेल्या 26 वर्षांपासून मी या एसटी महामंडळात वाहक पदावर आहे. मात्र, अद्याप मी स्वतः चे घरही घेऊ शकलो नाही. मग ही अशी नोकरी का करायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे

नोव्हेंबर महिन्याच्या 7 तारखेपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 238 कर्मचाऱ्यांचे निलंबन केलं आहे. तर 51 बडतर्फ केले आहे. मात्र, अद्यापही दोन हजार कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. संतोष राऊत यांच्याप्रमाणे इतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी उपजिविकेसाठी पर्यायी मार्ग शोधला आहे. बाजारात भाजी विक्रीपासून ते खाजगी वाहनावर रोजंदारी चालक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com