नागपूर एसटी विभागाला आठ दिवसात साडेचार कोटी रुपयांचा फटका

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम
नागपूर एसटी विभागाला आठ दिवसात साडेचार कोटी रुपयांचा फटका
नागपूर एसटी विभागाला आठ दिवसात साडेचार कोटी रुपयांचा फटकाSaam TV

नागपूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे नागपूर विभागाला तब्बल साडेचार कोटी रुपयांची फटका बसला आहे. दर दिवशी 48 लाख रुपयांचे नुकसान नागपूर विभागाला सहन करावे लागत आहे. तर दुसरीकडे संपामुळे गिरणी कामगारांच्या वाट्याला जसं दुःख आलं तसं आमच्या वाट्याला येऊ नये, अशी भीती एसटी कर्मचाऱ्यांना आहे.

हे देखील पहा -

एसटीचे शासनात विलगीकरण करावं, या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे एकीकडे प्रवाशांना खाजही वाहनांनी प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तर दुसरीकडे एसटी महामंडळाला देखील याचा फटका बसत आहे. नागपूर विभागाचे दर दिवशी 48 लाख रुपये बुडत आहेत. आठ दिवसापासून सुरू असलेल्या संपामुळे नागपूर विभागाचे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात आठ डेपो आहेत. या नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावरून दररोज पाच हजारांवर बसेस राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात. हजारो प्रवासी दररोज एसटी ने प्रवास करतात. त्यामुळे नागपूर विभागाला दररोज साधारणतः 48 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, संपामुळे हे उत्पन्न बंद असल्याने आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आणखी फटका बसत आहे.

नागपूर एसटी विभागाला आठ दिवसात साडेचार कोटी रुपयांचा फटका
ब्रेकिंग: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

एकीकडे महामंडळाला संपाचा फटका बसत असताना दुसरीकडे एसटी कर्मचारी संपामुळे आपली गिरणी कामगारांसारखी स्थिती होऊ नये, अशी भीती व्यक्त करत आहेत. दशकांपूर्वी पुढाऱ्यांनी चिथावल्यामुळे गिरणी कामगारांनी संप केला होता. अनेक दिवस तो चालला. मात्र, नंतर त्यांच्या वाट्याला दुःख आलं. तसं दुःख आणि दयनीय अवस्था आपली होऊ नये, अशी भीती एसटी कर्मचाऱ्यांना आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत चालला आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर राज्य सरकार अडून बसलंय. त्यामुळं या संपातून आमचं दुःख कमी होण्याऐवजी वाढू नये, अशीच अपेक्षा एसटी कर्मचारी करतया आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com