ST Strike : प्रवीण दरेकरांनी घेतली एसटी आंदोलकांची भेट

राज्यात एसटीची होत असलेली तोडफोड सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासण्याची गरज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
ST Strike : प्रवीण दरेकरांनी घेतली एसटी आंदोलकांची भेट
ST Strike : प्रवीण दरेकरांनी घेतली एसटी आंदोलकांची भेट दिनू गावित

नंदुरबार : राज्यात एसटीची होत असलेली तोडफोड सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासण्याची गरज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. आज त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा बस स्थानकातील आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांची बाजू समजून घेतली.

हे देखील पहा :

सरकारची पगारवाढ आभासी असून कर्मचाऱ्यांना किती लाभ होतो याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शासनाने दडपशाहीने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडू नये शरद पवारांनी विलीकरणाचा शब्द पाळावा, आम्ही सरकारचे अभिनंदन करु असे यावेळी दरेकरांनी म्हटलेय. मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने चर्चेस तयार असून विलीनकरण कसे होईल याचा शासनाला मार्ग दाखवतो असेही दरेकर म्हणाले.

ST Strike : प्रवीण दरेकरांनी घेतली एसटी आंदोलकांची भेट
महिलेच्या अंगाला दगड बांधून खाडीत फेकले! विरारमधील घटना
ST Strike : प्रवीण दरेकरांनी घेतली एसटी आंदोलकांची भेट
महिला पोलिसाने हात धुण्यासाठी खिडकीबाहेर काढला अन् साप चावला!

अनिल परब पत्रकार परिषदमध्ये जे काय बोलले हा शासन निर्णय नाही. पगारवाढीसह ज्या घोषणा केल्यात त्याचा अद्यापही लेखी शासन निर्णय निघाला नाही. कोर्टाने विलीनीकरण करु नका असे सांगितलेले नाही, समीतीचे सारे सदस्य सरकारचेच आहेत. त्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा समिती निर्णय घेईल असे सांगत बसू नये. महाराष्ट्रातील प्रवासी सहनशील असून एसटी कर्मचाऱ्यांसाठी ते त्रास सहन करुन त्यांना पाठबळ देत असल्याचे देखील दरेकरांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com