ST Strike: अनिल परबांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून ST कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला निषेध

परिवहन मंत्री अनिल परब हे आज एकदिवसीय सोलापूर दौऱ्यावर आले होते, मात्र, त्यांनी सोलापुरातील एस टी कामगारांची भेट घेणं टाळलं.
ST Strike: अनिल परबांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून ST कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला निषेध
ST Strike: अनिल परबांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून ST कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला निषेधSaam TV

सोलापूर : परिवहन मंत्री अनिल परब हे आज एकदिवसीय सोलापूर दौऱ्यावर आले होते, मात्र, त्यांनी सोलापुरातील एस टी कामगारांची भेट घेणं टाळलं, उलट आता कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या याच भूमिकेचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील संपवार बसलेल्या ST कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

ST Strike: अनिल परबांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून ST कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला निषेध
ST Strike: ST कामगारांवर केलेली कारवाई आता माघारी घेणार नाही - परिवहन मंत्री

जोपर्यंत विलीनिकरण होत नाही तोपर्यंत ST कर्मचारी (ST Employee) आंदोलनावर ठाम राहणार असल्याची भूमिका ही यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनकडून घेण्यात आली. दरम्यान आज दिवसभरात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २२८ असून आता एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १७४१ एकूण निलंबित कर्मचारी संख्या ११०२४ झाली आहे तसंच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३६७९ वर गेली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com