मिर्ची पूड टाकत धारदार शस्त्राने वार; भंडाऱ्यात इसमाची निर्घृण हत्या!

भंडारा-तुमसर राज्य मार्गावर खून...
मिर्ची पूड टाकत धारदार शस्त्राने वार; भंडाऱ्यात इसमाची निर्घृण हत्या!
राहुल जयस्वालअभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

भंडारा: डोळ्यात मिर्ची पावडर टाकून 30 वर्षीय इसमाचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या वरठी- भंडारा मार्गावरील गणेश नगरी जवळील राज्य मार्गावर उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव राहुल उर्फ बंटी लालचंद जयस्वाल (वय 30) रा. राजेन्द्र वार्ड टाकळी असे आहे.

राहुल जयस्वाल
Rajya Sabha Election 2022 : महाविकास आघाडीला मोठा धक्का; अनिल देशमुखांची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

मृतक राहुल हा काही कामानिमित्त गणेश नगरी परीसरात आपल्या दुचाकीने आला होता. दरम्यान, त्याच्या मागावर असलेल्या गुंडांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यामुळे तो खाली कोसळला. याचा फायदा घेत धारधार शास्त्राने त्याच्यावर सपासप वार करून त्याला ठार मारण्यात आले.

हे देखील पाहा-

मात्र, खून करण्याचे कारण काय आहेत याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हा हार्डवेअरचे काम करीत होता. मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत असून घटनास्थळी वरठी पोलीस दाखल असून मृतदेह पंचनामा करून उत्तरनिय तपासणी करीता पाठवण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com