Beed : राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे : राजू शेट्टी

शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन राज्यातील शेतकऱ्यांची सर्व पिक कर्जे माफ करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
Beed : राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे : राजू शेट्टी
Beed : राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे : राजू शेट्टीविनोद जिरे

"या माजलेल्या अधिकाऱ्यांना आवरा अन्यथा हा शेतकरी सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही"

खा. राजू शेट्टी

"सरकारने वाट्टेल ते करावं, अगोदर शेतकऱ्यांना मदत करावी तरच इथला शेतकरी वाचेल अन्यथा मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करेल"

रविकांत तुपकर

बीड : सरकार शेतकऱ्यासोबत वैऱ्या सारखे वागत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामध्ये काही फारसा फरक नाही, कारण केंद्र सरकारने पश्चिम महाराष्ट्रात जूनमध्ये महापूर झाला आणि पाहणी करायला आता पथक पाठवले. मराठवाड्यातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी तर मार्च-एप्रिलमध्ये पथक पाठवतील सद्या अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन राज्यातील शेतकऱ्यांची सर्व पिक कर्जे माफ करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

हे देखील पहा :

राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना आर्थिक जबाबदारी झटकून चालणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावरती आहोत. त्यामुळं या माजलेल्या अधिकाऱ्यांना आवरा अन्यथा हा शेतकरी सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिलाय. शेतकऱ्याच्या बांधावरती पाहणी करण्यासाठी सुद्धा काही शिल्लक राहिलेले नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यातच सोयाबीनची पेंड आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहे. तर, दुसरीकडे या संदर्भात ऊसाची एफ आर पी तीन टप्प्यात देण्याचे धोरण कारखानदार आणि सरकार राबवत आहे. विमा कंपन्यांनी प्रचंड बदमाशी केली असून विमा कंपनी खोटे रेकॉर्ड तयार करत आहे. या संदर्भात पुरावे आमच्याकडे आहेत. क्रॉप कटिंगचा रिपोर्ट सरळ-सरळ खोटा दिलेला आहे. एफआरपी च्या धोरणासंदर्भात आमचा कायम विरोध आहे. यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि कारखानदार चुकीचं धोरण राबवत आहे. शेतकरी एकटा पडलेला आहे केंद्र आणि राज्य आणि साखर कारखानदार यांच्या विरोधात सुद्धा आम्ही ही लढाई लढून जिंकणार आहोत असेही शेट्टी म्हणाले.

Beed : राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे : राजू शेट्टी
Beed : पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर दोघांना तलवारीने मारहाण!

महाविकास आघाडीवर नाराज असलो तरी उद्याच्या बंदला आमचा पाठिंबाच आहे. कोणी बंद पुकारला हे महत्वाचे नसून उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांवर अन्याय झालाय हे महत्वाचे आहे. अगदी जनरल डायरने सुद्धा शरमेने मान खाली घालावी या पद्धतीने गृह मंत्र्याच्या पुत्राने शेतकर्‍यांच्या अंगावरती गाडी घालून पाच शेतकऱ्यांना मारले. त्या शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे असे राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्याला गृहीत धरू नका शेतकरी एक दिवस तुमच्या मानगुटीवर बसल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला. दरम्यान सरकारने वाट्टेल ते करावं अगोदर शेतकऱ्यांना मदत करावी. तरच इथला शेतकरी वाचेल अन्यथा मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करेल. असं मागणी रविकांत तुपकर यांनी केलीय.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com