Alibag: अलिबागमध्ये उभारणार अद्यावत जिल्हा माहिती भवन, पालकमंत्री आदिती तटकरेंचा यशस्वी पाठपुरावा

रायगड जिल्ह्यासाठी स्वतःच हक्काचं जिल्हा माहिती भवन लवकरच साकारणार आहे.
Alibag Aditi Tatkare
Alibag Aditi TatkareSaam Tv

राजेश भोस्तेकर

रायगड: रायगड जिल्ह्यासाठी स्वतःच हक्काचं जिल्हा माहिती भवन लवकरच साकारणार आहे. अलिबाग पिंपळभाट येथे जिल्हा माहिती भवन इमारतीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सुसज्ज अशी माहिती भवन इमारत 5 कोटी खर्च करून उभारली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. राज्य शासनाचा निधी लागणारे पहिलेच माहिती भवन होत आहे (State cabinet gave approval for the District Information Building building in Alibag).

Alibag Aditi Tatkare
'रेझिंग डे' निमित्त अलिबाग समुद्रकिनारी पोलीस बँड पथकाचे आयोजन

जिल्ह्यात विकास संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. यासाठी अलिबाग (Alibag) पिंपळभाट येथील दहा एकर शासकीय जमीन प्रस्तावित केली आहे. या अद्ययावत जिल्हा माहिती भवनामध्ये जिल्हा माहिती कार्यालय, मिनी थिएटर, मिनी स्टुडीओ, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, प्रदर्शन दालन, विविधोपयोगी सभागृह, डिजीटल वाचनालय, मिडीया संनियंत्रण कक्ष, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरीता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र असणार आहे.

Alibag Aditi Tatkare
प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसासह महिला साथीदार अटकेत; अलिबाग पाेलिसांची कारवाई

रायगड (Raigad) जिल्हा हा औद्योगिक आणि पर्यटनाच्यादृष्टीने पसंतीचा आहे. जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोंकण रेल्वे, सागरी वाहतूक या माध्यमातून येणारे पर्यटक आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जनता शेती आणि पारंपरिक मासेमारी व्यावसायिक असून ग्रामीण, डोंगराळ आणि दुर्गम भागात वास्तव्यास आहे.

शासनाच्या योजनांची तसेच शासनाच्या विविध कामांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत तत्परतेने पोहोचविणे, ही एक अत्यावश्यक बाब आहे. आधुनिक काळाच्या आवश्यकतेनुसार जिल्हा माहिती कार्यालयात माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत आणि सुसज्ज मनुष्यबळ असणार आहे. माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या दूरदृष्टीने कार्यरत होणाऱ्या रायगड जिल्हा माहिती भवनामुळे विविध जनसंपर्क सेवा उपलब्ध होणार आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com