
मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टानं (Supreme court) राज्य सरकारला दणका देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. आगामी काळात जवळपास १४ महानगरपालिका आणि १५ जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने (Maharashtra government) केलेला कायदा फेटाळत १५ दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश नुकतेच दिले. याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगानेही (Maharashtra election commission) महापालिका निवडणूकी संदर्भात महत्वाचे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंतिम प्रभाग रचनेचे काम ११ मे पर्यंत पूर्ण करावे. प्रभाग रचनेच्या अंतिम प्रस्तावाची मान्यता १२ मे पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावी. १७ मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करावी.तसेच १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राज पत्रात अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी. असे महत्वाचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील मुंबई,ठाणे,पुणे,नागपूर,अमरावती,नवी मुंबई, वसई-विरार. उल्हासनगर. कोल्हापूर, अकोला,सोलापूर, नाशिक ,पिपंरी चिंचवड, कल्याण-डोंबिवली महापालिकांना पत्र पाठवून राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.