गोपीचंद पडळकरांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे - देवेंद्र फडणवीसांची मागणी

"गोपीचंद पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही गप्प बसणार नाही" असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
गोपीचंद पडळकरांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे - देवेंद्र फडणवीसांची मागणी
गोपीचंद पडळकरांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे - देवेंद्र फडणवीसांची मागणीSaam Tv

पंढरपूर: "गोपीचंद पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही गप्प बसणार नाही" असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत. राज्य सरकारने तात्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात केली. (State government should protect Gopichand Padalkar - Devendra Fadnavis demands)

हे देखील पहा -

आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर काल सांगलीतील आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता. या हल्ल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत राज्य सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु राज्य सरकार भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणीही विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com