शिक्षक पात्रता परीक्षा आयोजनाला मान्यता

येत्या १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात शिक्षक पात्रता परीक्षा होणार
शिक्षक पात्रता परीक्षा आयोजनाला मान्यता
शिक्षक पात्रता परीक्षा आयोजनाला मान्यता Saam tv

रामनाथ दवणे

मुंबई : शिक्षण क्षेत्रात (Education Field) आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना (Teachers) संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता दिली. येत्या १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन २०१८-१९ नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. (The Teacher Eligibility Test was approved)

शिक्षक पात्रता परीक्षा आयोजनाला मान्यता
विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाखांचा घोटाळा; 2 आरोपी गजाआड

दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी (TET) अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.२०१९ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेणे शक्य झाले नव्हते.

शालेय शिक्षण विभागाने मागील आठवडय़ात ६१०० शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षे मुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com