विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल...

आषाढी पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे वैभव आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल...
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल...भारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या पालखी सोहळ्यावर राज्य सरकारने State Government बंदी घातली आहे. त्यातच राज्यातील मंदिरांनाTemple टाळे लावलेले असताना मुख्यमंत्री उद्धव Uddhav Thackeray ठाकरे यांना विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी अकलूज येथे केला.

आषाढी पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. अशा या सोहळ्याला येण्यासाठी सरकारने वारकऱ्यांना बंदी केली आहे. दुसरीकडे मात्र, राज्याचे मुख्यमंत्री शासकीय महापूजेला पंढरपूरला येणार आहेत. त्यामुळे त्यांना विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरला नाही.

हे देखील पहा -

वारकर्‍यांनी घेतलेल्या‌‌ भूमिकेला भाजपचा पाठिंबा असल्याचेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपंचायत व नगर परिषदेमध्ये रूपांतर करावे या मागणीसाठी अकलूज प्रांत कार्यालया समोर गेल्या 24 दिवसांपासून येथील नागरिकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रवीण दरेकर आज अकलूज येथे आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर. सडकून टिका केली. सरकारने येथील जनतेला न्याय द्यावा अन्यथा सरकारच्या विरोधात आक्रमकपणे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल...
शाळेला चाललो आम्‍ही..धुळ्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू

मुंबईची लोकल सुरू करावी अशी मागणी केली आहे. परंतु राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने तातडीने मुंबईची लोकल सुरू करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे देखील प्रवीण दरेकर म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने करण्यात यावी. सरकार लोकशाही संविधानानुसार ही निवडणूक पार पडेल असा विश्वास ही दरेकर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नाना तऱ्हा असल्या तरी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. परंतु त्यांच्याच पक्षातील लोक त्यांच्या भूमिकेला विरोध करतात असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com