Beed: मराठवाडामुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाची राज्य सरकारने अनास्था दाखवली - अजित पवार

हैदराबाद सारखा भव्य अमृत महोत्सवी कार्यक्रम औरंगाबादमध्ये घ्यायला पाहिजे होता...
Ajit Pawar Beed
Ajit Pawar BeedSaam Tv

बीड - आज मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. पण मराठवाडा आजही मागासलेपणाच्या जोखडात अडकलाय. काही क्षेत्रात भरारीही घेतली, आज अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा मुक्ती संग्रामाचा लढा आठवला जातोय. औरंगाबाद येथील कार्यक्रम केवळ 15 मिनिटांत आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हैदराबाद येथील कार्यक्रमाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

हे देखील पाहा -

हजारो मराठवाडा मुक्ति सैनिकांनी जीवाची बाजी लावत स्वतंत्र मिळवलं. त्याचं मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृत महोत्सवाची राज्य सरकारने अनास्था दाखवली आहे. हैदराबाद सारखा भव्य अमृत महोत्सवी कार्यक्रम औरंगाबादमध्ये घ्यायला पाहिजे होता अशी इच्छा अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली. ते बीडमध्ये बोलत होते.

Ajit Pawar Beed
Viral Video: म्हशीने तरुणीसोबत केलं असं काही; हसून हसून लोटपोट व्हाल!

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीने 75 कोटी दिले होते. समिति नेमली होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नविन समिती सुद्धा नेमली नाही. सरकर येत असतात जात असतात, कुणीही ताम्र पट घेवून आले नाही. मराठवाड्याच्या गौरवशाली इतिहासा बद्दल मुख्यमंत्री यांनी अनास्था दाखवली हे खेदाचं आहे. मराठवाड्याच्या गौरवशाली लढ्याची माहिती सर्वांना कळाली पाहिजे. मराठवाड्याच्या विकसाकडे देखिल लाख दिल पाहिजे असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com