भोंगे, मास्टर सभा, बूस्टर सभा याकडे लक्ष देऊ नका, राज्यमंत्री संजय बनसोड म्हणाले...

महाविकास आघाडीसह मनसे आणि भाजपने जंगी सभा घेत पक्षबांधणीला सुरुवात केलीय.
Sanjay Bansode
Sanjay BansodeSaam tv

शिर्डी : राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वंभूमीवर सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीसह मनसे आणि भाजपने जंगी सभा घेत पक्षबांधणीला सुरुवात केलीय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे मेळाव्यात मशिंदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर राजकीय वातावर तापल्याने विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने बूस्टर सभा तर शिवसेनेने (Shivsena) मास्टर सभा घेतली. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलं असून राज्यातील नेते मंडळी यावर प्रतिक्रिया देत आहेत. राज्यमंत्री संजय बनसोड (Sanjay Bansode) यांनीही शिर्डी दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधून प्रतिक्रिया दिली आहे. आमचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिकवलंय की, निवडणुकीपुरतेच राजकारण करा आणि इतरवेळ समाजकारणासाठी द्या. आमचा पक्ष नेत्यांच्या विचारधारेवर सातत्याने काम करतो. भोंगे,मास्टरसभा ,बुस्टर सभा याकडे लक्ष न देता जनतेच्या न्यायासाठी लक्ष देतोय. राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. असं वक्तव्य बनसोड यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना केलं आहे.

Sanjay Bansode
राजभवनाच्या खर्चात १८ कोटींची वाढ; आरटीआयच्या माहितीत उघड

राज्यमंत्री बनसोड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. जाती-जातीमध्ये विष पेरण्याचं काम काही मंडळी करत आहेत.हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहावे हीच साईचरणी प्रार्थना केली. आमचे नेते शरद पवार यांनी शिकवलंय की, निवडणुकीपुरतेच राजकारण करा आणि इतरवेळ समाजकारणासाठी द्या. आमचा पक्ष नेत्यांच्या विचारधारेवर सातत्याने काम करतो.

भोंगे, मास्टरसभा ,बूस्टर सभा याकडे लक्ष न देता जनतेच्या न्यायासाठी लक्ष देतोय.राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. त्यानंतर पाणीटंचाईवर बोलताना बनसोड म्हणाले, एसडीएमऐवजी आता तहसिलदारांना अधिकार दिलेत. जेथे पाणीटंचाई तेथे उपाययोजना करून पाणी देण्याची व्यवस्था आम्ही करतोय. २०२४ पर्यंत ग्रामीण भागात प्रती व्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचा आमचा हेतू आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com