Sharad Pawar : ...तर महापालिकेच्या आगामी निवडणूका स्वबळावरती लढू - शरद पवार

'हिंसाचाराबाबत Specific बोलणं गरजेचं असून या दंगलीच्या काळात गृहमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी अमरावती, नांदेड मालेगावला भेट द्यावी. '
Sharad Pawar : ...तर महापालिकेच्या आगामी निवडणूका स्वबळावरती लढू - शरद पवार
Sharad Pawar : ...तर महापालिकेच्या आगामी निवडणूका स्वबळावरती लढू - शरद पवारSaamTV

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आजपासून चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Tour) आहेत. यावेळी त्यांनी नागपुरातील कार्यक्रम संपल्यावरती पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवरती भाष्यं केलं. ते म्हणाले नागपूर, गडचीरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ ला जाऊन कार्यकर्त्यांशी भेटावं म्हणून हा दौरा काढला आहे. या दौऱ्यामध्ये शेतकरी आणि कृषी प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याच पवार म्हणाले. (Statement of Sharad Pawar)

हे देखील पहा -

काही लोकांनी दंगलीचा फायदा घेतला -

राज्यात झालेल्या दंगलींमध्ये (Riots) कुणाचा हात आहे, याबाबत पाठवलेल्या अहवालाबाबत आपणाला काही माहिती नाही तसेच हिंसाचाराबाबत स्पेसीफीक बोलणं गरजेचं असून या दंगलीच्या काळात गृहमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी अमरावती, नांदेड मालेगावला भेट द्यावी. त्रीपुरात (Tripura) जे घडलं त्याची प्रतिक्रिया इकडे होण्याची गरज नव्हती अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिवाय निवडणूकांमध्ये फायदा घेण्यासाठी काही लोकांनी याचा फायदा घेतला अशी माहिती आहे, याच्या खोलात जाण्याची गरज असून रजा अकादमीवर बंदी बाबत, त्या संघटनेची सर्व माहिती घेवून, पुढील ठरवायला हवं असही पवार म्हणाले.

तर स्वबळावरती लढू -

Sharad Pawar : ...तर महापालिकेच्या आगामी निवडणूका स्वबळावरती लढू - शरद पवार
"शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी करणार; मात्र मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार"

दरम्यान पत्रकारांनी शरद पवारांना नागपूर महानगरपालिका निवडणूकीत (Nagpur Municipal Corporation Elections) एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला असता 'हे आत्ताच सांगता येणार नाही. पण आघाडी केलेले पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल. असं पवार म्हणाले तसेच आगामी निवडणुकीत आघाडी केलेले पक्ष एकत्र आले तर योग्य; नाही तर एकटं, स्वबळावरती लढू असं देखील पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणूकीमध्ये आघाडीची युती होणार की एकत्र लढणार हे लवकरच कळेल.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com