डॉ. शेळके आत्महत्या प्रकरण; कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठिशी

डॉ. शेळके आत्महत्या प्रकरण; कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठिशी
पाथर्डीचे आरोग्य अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

नगर - पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील उपकेंद्राचे प्रमुख डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यात त्यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते. त्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा उल्लेख होता.

या आत्महत्ये प्रकरणाने आरोग्य विभाग चांगलाच हबकून गेला होता. डॉ. दराडे यांच्या समर्थनार्थ कर्मचारी पुढे सरसावले आहेत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनाही निवेदन दिले आहे. त्या निवेदनात ते म्हणतात, डॉ. शेळके यांची आत्महत्या आमच्यासाठी वेदनादायक आहे. परंतु डॉ. दराडे यांच्यावर केलेला जाचाचा आरोप वेदनादायी आहे. दराहे हे कर्तव्यतत्पर अधिकारी आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीच्या काळात मदत केली आहे. त्यांच्यावर आरोप होत असतील तर हे चुकीचे आहे. Statement of staff to police for help of Pathardi taluka health officer

पाथर्डीचे आरोग्य अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
आधी नडला मग रडला! पोलिसाला कपडे काढून मारण्याची धमकी देणाऱ्याला हिसका

समुदाय आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी पद्धतीचे आहे. त्यात ४० हजार रूपये वेतन मिळते. २५ हजार हे मानधन आहे तर उर्वरित मानधन हे कामावर अवलंबून असते. नेमून दिलेले काम झाले नाही तर कपात होतच असते. संपूर्ण तालुक्यातील मे आणि जून महिन्यातील वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांचेच वेतन अडवले असे होत नाही.

निवेदनात त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी दराडे यांची पाठराखण करताना शेळके यांच्या आत्महत्येबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. पोलिस तपासात योग्य ती कारणे समोर येतीलच. आमचा सहकारी या जगातून गेला आहे. तर दुसरीकडे आमच्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची प्रतिमा क्रूर, निष्ठूर बनली आहे. याचाही विचार करावा, असे म्हटले आहे.Statement of staff to police for help of Pathardi taluka health officer

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com