बुलढाणा शहरात 12 महापुरुषांचे पुतळे उभारणार

या शहराचे सुशोभिकरण योग्य प्रकारे व्हावे यासाठी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यानी विडा उचलला असून शहरात प्रत्येक चौकात सर्व महापुरुषांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत.
आमदार संजय गायकवाड
आमदार संजय गायकवाडSaam Tv

बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे (Buldhana District) मुख्यालय असून शहराचे नियोजनबद्ध सुशोभिकरण करण्याचा संकल्प आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यानी केला आहे. बुलढाणा शहर हे समुद्र सपाटी पासून 960 मीटर उंचीवर वसलेले आहे. इंग्रजांनी हे शहर थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केले होते, व इंग्रजांनी बुलढाणा शहरात अनेक वर्ष वास्तव करीत त्यानी त्यांच्या काळात असंख्य वास्तु बांधून ठेवल्या आहेत. त्या वास्तु आजही जश्याच्या तश्या उभ्या आहेत.

या शहराचे सुशोभिकरण योग्य प्रकारे व्हावे यासाठी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड़ यानी विडा उचलला असून शहरात प्रत्येक चौकात सर्व महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेऊन तसे प्रस्ताव मंजूरी साठी शासनाकडे दाखल सुद्धा केले असल्याची माहिती आमदार गायकवाड़ यानी दिली आहे.

आमदार संजय गायकवाड
लावणी सम्राज्ञीची निवडणूक लढण्याची इच्छा; शिवसंग्रामकडे तिकीटाची मागणी

छत्रपति शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाउ साठे, महाराणा प्रतापसिंग, सावित्रीबाई फुले आदि महापुरुषांचे पुतळे बुलढाणा शहरात प्रथमच उभारले जाणार असून त्या पुतळया भोवती योग्य ते सौंदरिकरण केले जाणार असल्याचेही त्यानी स्प्ष्ट केले.

तसेच शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रस्त्याचे रुंदीकरण, अंडरग्राउंड नाल्या, उड्डानपुल, ठिकठिकाणी वृक्षारोपण, सुसज्ज व्यायाम शाळा, आधुनिक ग्रंन्थालय, सुसज्ज नाट्यगृह व मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी अत्याधुनिक साहित्य, आदि ... असे स्वरूप काही काळाताच पूर्ण करण्याचा संकल्प आमदार गायकवाड़ यानी बोलून दाखविला आहे. राज्यातुन येणाऱ्या व्यक्तीला बुलढाणा शहराचे वैभव पाहुन तो भारावला पाहिजे अस शहर बनविन्याचा संकल्प आमदार संजय गायकवाड़ यानी केला असल्याने शहरवासियानी त्यांचे कौतुक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com