Latur: शिक्षणाला प्रॅक्टीकल्सची जोड; लातूरचा रॅंचो विद्यार्थ्यांना करवतो विज्ञानाची सफर

Steem Education Center Latur: लातूरच्या रॅंचोची अर्थात ओमप्रकाश झुरुळे याची अजब-गजब शाळा चर्चेचा विषय ठरली आहे.
Steem Education Center, Latur
Steem Education Center, Laturदिपक क्षीरसागर

लातूर: लातूरात (Latur) एक अजब-गजब शाळा आहे. तिथं ना पुस्तक ना सिलॅबस पण मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन घडविले जातात. एवढ्या युनिक प्रात्यक्षिक शिक्षणाची प्रयोगशाळा देशात कुठेही नसेल. या शाळेला (School) याला कोणताही सिलॅबस नाही. इथं होमवर्क नाही. इथं परीक्षा नाही. इथं यायचं प्रयोग शिकायचे, प्रयोग करायचे. एक मिनिटही इथलं शिक्षण कंटाळवाणं वाटत नाही. अशी ही लातूरच्या रॅंचोची अर्थात ओमप्रकाश झुरुळे याची अजब-गजब शाळा चर्चेचा विषय ठरली आहे. (Latur Latest News)

हे देखील पाहा -

या शाळेत दिवसाची सुरुवात होते मोठ्या दुर्बीणीपासून. यातून अनेक ग्रहांचे दर्शन होते. खगोलशास्त्र कळते, मोठा पृथ्वीचा मोठा गोळा समोर दिसतो. त्याला उघडलं की आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाच स्तर दिसतात त्याला नंबर टाकून ठेवलेले. त्या नंबरवर जाऊन स्कॅन केलं की त्या स्तराची माहिती मिळते. त्यातून अख्खं भूगर्भशास्त्र समजतं. पुढे मानवी पुतळा दिसतो. त्याचा प्रत्येक सूक्ष्म भाग खोलून बघता येतो. त्यातून जीवशास्त्र कळते. पुढे एक विमान दिसलं, म्हटलं हे काय तर हे इरॉनेटिक सायन्स. त्यासोबत पॉकेटमध्ये सुट्टे पार्ट. म्हणाले विमान कसं बनवायचं याचं प्रात्यक्षिक इथं देतो. असे एक नव्हे अनेक प्रयोग इथं अनुभवायला मिळतात.

या संस्थेचं नाव आहे 'STEEM Education Center, Latur' सायन्स, टेकनॉलॉजी इमर्जिंग मीडिया. "आठवड्यातून पाच तास आम्हाला द्या, तुमचं पाल्य पुस्तक हातात न घेता अख्ख विज्ञान, तंत्रज्ञान आमच्याकडे शिकेल" असा दावा ही शाळा करत आहे. येत्या काही वर्षात यातून अनेक वैज्ञानिक तयार होतील. बघितल्यापासून तर विज्ञान आणि गणितात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांना विषय कमालीचे सोपे आहेत असं वाटायला लागत. ही संस्था चालवणाऱ्या 'रॅंचोचं' नाव आहे ओमप्रकाश झुरुळे (Omprakash Zurule).

Steem Education Center, Latur
मराठी रंगभूमीवर शोककळा; 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

लातूर शहरातील अनेक विद्यार्थी या शाळेत स्वतः प्रयोग करुन विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यास करत प्रगती साधत आहेत. जगातील प्रगत राष्ट्र विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना कृतीयुक्त शिक्षणातून भविष्य घडवत आहेत, तर भारतात पुस्तकी शिक्षणावर भर दिला जात असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन अल्प प्रमाणात रुजतो. आता लातूरच्या या स्टीम शाळेतून नक्कीच कृतियुक्त शिक्षणातून वैज्ञानिक घडतील यात शंका नाही.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com