Video : अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सापडला तब्बल १०० किलो वजनाचा 'पाकट' मासा

Stingray Fish Found In Alibaug : या माशाचे वजन तब्बल १०० किलो इतके असून ह्या माशाने नाखवा यांना १५ हजार रुपये एवढी किंमत मिळू शकते.
Video : अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सापडला तब्बल १०० किलो वजनाचा 'पाकट' मासा
Stingray Fish Found In Alibaugसचिन कदम

अलिबाग : खोल समुद्रातील मच्छीमारी बंद असल्याने अर्थिक विवंचनेत असलेल्या कोळी बांधवाला निसर्गाने दिलासा दिला आहे. काल अलिबाग समुद्र किनाऱ्यावर दिनेश नाखवा आणि दिपिकेश नाखवा या कोळी बाप बेट्यांना तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा (Stingray Fish Found In Alibaug) सापडला आहे. वाघ्या पाकट नावाचा हा मासा असून अलिबागच्या कुलाबा किल्ल्याच्या मागील भागात मासेमारी करत असताना हा मासा सापडला. या माशाचे वजन तब्बल १०० किलो इतके असून ह्या माशाने नाखवा यांना १५ हजार रुपये एवढी किंमत मिळू शकते. हा मासा मुंबईतील व्यापाऱ्यांना विकण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Alibaug Latest News)

हे देखील पाहा -

पाकट माशाबद्दल थोडक्यात माहिती (Brief information about stingray fish)

पाकट माशाचे मांस खाल्ले जाते. त्याच्या यकृतापासून आणि शरीरापासून तेल मिळवितात. त्यांना अनुक्रमे यकृत तेल आणि शरीर तेल म्हणतात. यकृत तेलात अ आणि ड ही जीवनसत्त्वे असतात. शरीर तेलाचा उपयोग वंगण, खाद्यतेल आणि साबण तयार करण्यासाठी केला जातो. त्यांच्या त्वचेपासून कमाविलेले कातडे विविध प्रकारे वापरतात. पावसाळ्यात मुंबईच्या किनाऱ्‍याला पाकट मोठ्या संख्येने आढळतात. पाकटाच्या नांगीने केलेल्या इजांमुळे माणसे जखमी झाल्याच्या अनेक घटना घडत असतात.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com