MSRTC: लातूर- उस्मानाबाद बसवर दगडफेक; दाेन महिला जखमी

लातूर- उस्मानाबाद बसवर दगडफेक का करण्यात आली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
MSRTC Bus
MSRTC BusSaam tv

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : एस. टी. कर्मचाऱ्यांच्या (msrtc employee) प्रदीर्घ आंदोलनानंतर एसटीची सेवा (msrtc bus) पूर्वपदावर येत आहे. त्यातच उस्मानाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने साेमवारी रात्री बसवर दगडफेक (bus) केल्याचा प्रकार घडल्याने बसमधील प्रवासी घाबरले हाेते. या घटनेत दोन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. (osmanabad latest marathi news)

उस्मानाबाद (osmanabad) शहरातील एम.आय.डी.सी.परिसरात लातूरहून (latur) आलेल्या बस क्रमांक एमएच २० बीआय ०८६० यावर साेमवारी रात्री नऊ वाजता दगडफेक झाली. या बसमध्ये २० प्रवासी हाेते.

MSRTC Bus
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

त्यापैकी दाेन महिला प्रवाशांना काचा लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. लातूर- उस्मानाबाद बसवर दगडफेक का करण्यात आली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

Edited By : Siddharth Latkar

MSRTC Bus
Thane: गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार; अटकपुर्व अर्जावर बुधवारी सुनावणी
MSRTC Bus
Satara: राजकीय परिस्थिती बदलली अन् मकरंद पाटलांनी डाव साधला : मदन भाेसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com