जिल्हाध्यक्षाच्या वाहनावर दगडफेक; अजित पवारांच्या नात्यातील युवक
aditya gore

जिल्हाध्यक्षाच्या वाहनावर दगडफेक; अजित पवारांच्या नात्यातील युवक

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पारडी फाटा येथील घाटात बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे aditya gore यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या ncp कार्यकर्त्यांनी घाटात धाव घेतली हाेती.

aditya gore
उदयनराजेंचा सरकारवर घणाघात; ‘टाईमपास’ बंद करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पारडी फाटा येथील घाटात रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकाराची नाेंद वाशी पोलिसात झाली आहे. पाेलिसांनी तूर्तास अनाेळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद केला आहे.

राष्ट्रवादीच्या गाव संपर्क अभियानला आदित्य गोरे जात होते तेव्हा घाटात त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. या दगडफेकीत वाहनाची मागील बाजूची एक काच फुटली असून कोणीही जखमी नाही. आदित्य गोरे हे अजित पवार यांच्या मेहुणीचा मुलगा आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com